Posts

Showing posts from July, 2007

"शांतता... कोर्ट चालु आहे" आणि "महानिर्वाण"

"हिंसा आणि वासना या माणसाच्या मुलभुत भावना आहेत!" "तें"च्या या विश्वप्रसिध्द वाक्याला कसल्याच सिद्धांताचा टेकु न देता मी पट्कन मान्य करुन टाकतो. शेपूट गळून गेलं तरी आपण आपल्यातलं जनावर जपतोच नां? जंगल काय झाडांचंच असतं? जनावरं राहातात त्याला जंगल म्हणतात मग ते भलेही इमारतींचं असो. आपल्या बहुतेक कुठल्याच साहित्यात/कलेत हा रासवटपणा का उतरत नाही? एक मिनीट; भडकपणे लिहीणं म्हणजे या विषयाला भिडणं नव्हे. किरण नगरकर (रावण आणि एडी) आणि नातिचरामी (मेघना पेठे) आणि तत्सम लिखाण (गौरी, अर्थातच अपवाद..सानिया पेक्षा कितीतरी जोरकस आणि सकस) निदान मला तरी मुद्दाम "धाडसी" केल्यासारखं वाटतं. किरण नगरकर तर अगदी इंग्रजीतल्या चलाऊ लेखकांइतका टाकाऊ... वासना आणि हिंसा यांच्या व्याख्या हिंदी सिनेमात दाखवतात तश्या पावसात भिजणारया बाया (किंवा एकमेकांवर आपटणारी "कलात्मक" फुलं) आणि टोमॅटो केचपचे डाग या पुरत्याच मर्यादित आहेत? "ईडिपस" आणि " ऑथेल्लो"त वासना आणि हिंसा नाही? मराठीत असे मैलाचे दगड का नसावेत? पांढरपेश्यांनी लिहीलं म्हणून आणि झाकून ठेवण्याच्या तद्

फोटोग्राफीचं खुळ

Image
"अरे..जरा त्या प्रत्युष कडे बघ...त्याच्याशी काही तरी बोल..तो लॅपटॉप आता बंद कर" कल्याणीनं निर्वाणीच्या आवाजात सांगीतलं. Frequency Meter वर Frequency बघीतली. काटा पार रेड झोन मधे होता... आता मात्र हे डबडं बंद करावच लागेल! आता तुम्ही म्हणाल ही Frequency Meter काय भानगड आहे? लग्नाळलेले सारे लोकं (पक्षी: पुरुष)आवाजाच्या टोन वरुन वाक्यातील गंभीरता समजु शकेल असा शोध लावण्याच्या प्रयत्नात असतात. Frequency Meter हा असाच एक wish list वर असणारा शोध आहे!! बाय द वे, लग्नाळलेले- या माझ्या नव्या शब्द शोधाबद्दल तुमचं काय मत आहे? प्राणी जसे सर्कशीत माणसाळतात तसे पुरुष संसारात (कोण ओरडतय सर्कस-सर्कस म्हणून?) लग्नाळतात. दोन्हीचा अर्थ एकच असेल का बरे? असो. मी थोड्यावेळ विचार केला आता काय करावं? प्रत्युषला फोटो साठी पटवलं. तो पटकन तयार झाला. अर्धा तास विविध पोझ मधे फोटो काढले. मला सारखा डाऊट येत होता की कोणी तरी आपल्यावर हळूच लक्ष ठेवतय. पण मी दुर्लक्ष केलं. अजून थोडे फोटो काढल्यावर आम्ही दोघंही बोअर झालो. मग आमचं असं ठरलं की थोड्यावेळ कंम्प्युटर वर त्याची सीडी लावायची. त्यात चित्र रंगवण्यात अजू