Posts

Showing posts from April, 2007

गणित

परवा प्रत्युषचा result आणायला गेलो होतो. कोणी आमचा फोटो काढला असता तर आमची मुखकमले किती प्रेक्षणीय झाली होती हे कळालं असतं. प्रत्युष सोबत नव्हता आणि मी आणि कल्याणी गोरयामोरया चेहरयाने अंजली teacher समोर उभे होतो. It was a funny situation, now I think. निकाल इयत्ता नर्सरीचा! अंजली टीचरचं वय फार फार तर २५-२६ असेल आणि तरीही आम्ही टेन्शन मधे होतो:). प्रत्युषचं शाळेतलं कर्तॄत्व तसं कोण्या अथर्व फाटकला बुकलणे, "शेपटीवाल्या प्राण्यांची सभा" या "सुपरहीट" गाण्यात मासा होणे, रोज शाळेत फक्त नाश्त्यासाठीच जातो असा पक्का समज करुन घेणे इतपतच मर्यादित होतं. शिवाय "परिक्षेहून" आल्यावर त्यानं "मी टीचरला काहीही सांगीतलं नाही कारण त्यांनी मला थांबवून घेतलं असतं आणि माझी व्हॅन चुकली असती" असंही declare केलं होतं. इथे declare या शब्दाला वेगळा वास आहे- ही एकतर्फी सुचना आहे, त्यावर परत वाद घालायचा नाही!! आणि चाणाक्ष लोकांना या वाक्यातील टिळकांसारखा तीव्र मराठी बाणाही जाणवला असेलच. एव्ह्डं सगळं होऊनही चिरंजीव "Excellent" शेरयाने "पास" झाले हा आम्हाला

स्मिताचं अचानक आठवणं

I do not need to see you appear; being born sufficed for me to loose you a little less - Rilke परवा एका फिल्मी फंक्शनमधे स्मिताचा मुलगा आला होता स्मिताचं पोस्टर inaugurate करायला. Ditto स्मिता! खोल आत काही तरी ढासळलं. स्मिता हवी होती आज असं वाटून गेलं. आज सिनेमात इतके प्रयोग सुरु आहेत, चांगल्या अभिनेत्यांसाठी रोल लिहीले जाताहेत, commercial आणि art films मधली रेघ पुसट होत चालली आहे आणि स्मिता नाही? स्मिताच्या अभिनयबद्द्ल नव्याने काय लिहायचं? she made a history; but she is history now.स्मिता म्हटलं की मला आठवतो जैत रे जैत, अर्ध्यसत्य, मिर्चमसाला आणि अजून कितीतरी powerhouse performances. नमकहलाल सारखे काही अपवाद सोडले तर स्मिताची बहुतेक characters तिच्यातील स्वतंत्र स्त्री represent करायचे. स्मिता म्हटलं की सगळ्यात आधी मला आठवतात ते डोळे. टपोरे, हरीणासारखे वगैरे विशेषणं आपण वापरुन पार चोथा केली आहेत. स्मिताचे डोळे पाहीले की भावगर्भ या शब्दाचा अर्थ कळतो. She can speak a thousand words without saying a single line. Her eyes will do that for her. काळजाला भिडणारी दुसरी identity म्हणजे तिचा आव

वास्तुपुरुष

फ्लॅटमधे राहाणारया आपण मंडळींनां वास्तुपुरुष ही संकल्पना माहीत असण्याचं काही काम नाही. कदाचित शब्दःश अर्थ माहीत असेलही पण त्याची intensity कळायचं काही कारण नाही. सिनेमे बघुन असं काही जाणवू शकेल हे मला काही वर्षांपुर्वी सांगीतलं असतं, तर मी खुप हसलो असतो. पण सुमित्रा भावेंचा वास्तुपुरुष पाहीला आणि संदर्भाच्या सारया चौकटीच बदलुन गेल्या. सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याची चर्चा ऎकली होती की रिलीज डेट मुळे कसलंसं award हुकलं वगैरे (असं काही ऎकलं की मला या सगळ्याशी जी एं चा काही काळीजबंध असेलसं नेहमीच वाटतं.) हे तितकसं महत्वाचं नाही. Star Attraction होते एलकुंचवार! त्यांच्या लिखाणावर (नंतर मौनरागात त्याचे बरेच संदर्भ सापडले) पिक्चर, शिवाय त्यांनी त्यात काम केलेलं. सिनेमाची स्टोरी मोठी touching आहे आणि साधीही. बडा घर पोकळ वासा असं वतनदार देशपांडेंच घर, गांधी भक्तीत वाया गेलेला निकम्मा बाप, छंदी-फंदी, पीळ न गेलेला पण प्रेमळ काका, प्रेमात पारच फसलेला भाऊ आणि शिक्षणासाठी सर्वस्व त्यागु शकणारी भास्करची आई. पुर्ण सिनेमा भास्करची तगमग, खचलेल्या घराला बाहेर काढण्याचा ताण आणि आईचा सिनेमाव्यापून उरणारं म

मुकुल शिवपुत्र कोमकली

मुकुल शांतपणे विलंबित लयीत गाणं सुरु करतो, तब्येतीत. राग: बागेश्री स्थळ: अजीबातच महत्वाचं नाही (घर, कार; जिथे शांतता असेल ते कोणतही). पहीली पाच एक मिनीटं तो कुमारांचा मुलगा आहे वगैरे मनावर ठसवण्यावर जातात (आपणच आपल्याच मनावर रे). पुढची अजून काही मिनीटं त्याची कुमारांशी तुलना करण्यात जातात, त्याचा आवाज किती कुमारांसारखा आहे नै, पण कुमारांसारखा मोकळा गात नाही वगैरे टिपीकल सवाई गंधर्व महोत्सवी कळाहीन कॉमेंट्स नोट करण्यात जातात, आपण बिल्कुल लक्ष नाही द्यायचं. मुकुल गातच असतो. मुकुल गात नसतो, मुकुल सुटलेला असतो. मुकुल अप्रतीम सहजतेने रागाची मांडणी करतो, तानांची भेंडोळी उलगडणं वगैरे फालतु लाडच नाहीत, आरोह-अवरोहं सारं शिस्तीत. स्पष्ट उच्चार, अफाट effortless पणे रागाची मांडणी; मुकुल माझ्या अंगांगात भिनतो, या बाबतीत डिट्टो कुमार! मध्येच कधीतरी लक्ष्यात येतं त्याच्यावरच्या कर्नाटकीचे संस्कार, कुमारतर आहेतच पण तरीही याची अशी एक शैली आहे. शरीराला सहन न होणारा वेग - मग अचानक थांबणं - काही कळायच्या आधीच परत हा माणूस त्याच गतीतून प्रवास करत असतो, भौतिकशास्त्राचे सारे नियम खुंटीवर टांगून! मध्येच अंगाव